अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपचे कमळ आणि काँग्रेसचा पंजा अशी थेट लढत दिसत आहे. या मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा आणि काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांनी निवडणूक लढली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे मतदारसंघातील राजकीय चित्र फार वेगळं दिसलं. तसेच मतदारसंघात प्रहारकडून दिनेश बुब तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघातील मतदार कोणाला संसदेत पाठवणार, हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात एकूण १८.३६ लाख मतदार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान झालं. या मतदारसंघात एकूण ६४.०२ टक्के मतदान झालं. अमरावतीतील मेळघाट मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं. या मतदारसंघात अपेक्षित मतदानापेक्षा २ टक्के मतदान अधिक झालं.
महायुतीमधील नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता. भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रहारकडून बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली.
नवनीत राणा यांनी २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळीही राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.
नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अडचणी वाढल्या होत्या. मात्र, निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा मिळाला. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून अवैध ठरवलं असतं, तर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग खडतर झाला असता.
यंदा राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाने मतदारसंघातील राजकीय चित्रही संपूर्ण बदललं. दुसरीकडे या मतदारसंघात एकही भाजपचा उमेदवार नाही. तरी देखील एक्झिट पोलमध्ये नवनीन राणा या विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एक्झिट पोलमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा आघाडीवर दिसत आहेत. तर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि दिनेश बूब पिछाडीवर दिसत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोण जिंकणार, हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.