Assembly Election Result 2024: लोकसभेआधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल होणार जाहीर, उद्याच मतमोजणी

Arunachal Pradesh and Sikkim Assembly Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी रविवारी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.
लोकसभेआधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल होणार जाहीर, उद्याच मतमोजणी
Arunachal Pradesh and Sikkim Assembly Election ResultSaam Tv

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसह सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. सिक्कीममध्ये लोकसभेची एकच जागा असल्याची माहिती आहे. 2 जून रोजी सकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

लोकसभेची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. सिक्कीममध्ये मुख्यतः सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि त्याचा प्रमुख विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत आहे. भारतीय जनता पक्ष सुमारे 5 जागांवर लढत आहे. याशिवाय सिटीझन ॲक्शन पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात आहे.

लोकसभेआधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल होणार जाहीर, उद्याच मतमोजणी
India Alliance Meeting: इंडिया आघाडी 295 जागा जिंकेल, महत्त्वाच्या बैठकीनंतर खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

सिक्कीममध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी एसकेएम प्रयत्नशील आहे. याआधी एसडीएफ 2019 पर्यंत 25 वर्षे सत्तेत होती, जी आता पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग गोळे यांच्यासह एसकेएमच्या नेत्यांनी ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी असल्याचा दावा केला.

ते म्हणाले की, सिक्कीमचे मतदार आमच्या बाजूने कौल देतील. एसकेएमचे प्रवक्ते जेकब खालिंग राय म्हणाले, 'आम्ही 32 पैकी 26 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. राज्यातील मतदार एसडीएफला आणखी एक संधी देणार नाहीत. ज्यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने भरलेला होता.

लोकसभेआधी सिक्कीम आणि अरुणाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल होणार जाहीर, उद्याच मतमोजणी
NCP Working President : लोकसभा निकालाआधी 'राष्ट्रावादी'त मोठ्या घडामोडी; सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही 2 जून रोजी सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. अरुणाचलमध्ये 19 एप्रिलला विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. 2 जून रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 2000 हून अधिक कर्मचारी तैनात केले जातील, असे मुख्य निवडणूक अधिकारी पवन कुमार सैन यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com