NCP Working President : लोकसभा निकालाआधी 'राष्ट्रावादी'त मोठ्या घडामोडी; सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांची निवड करण्यात आली आहे. तर राजीव झा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
NCP Working President
NCP Working President Saam Digital

लोकसभेचा निकालापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे बदल करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राजीव झा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत फू़ट पडल्याल्यापासून हे पद रिक्त होतं. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पलडी या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

पी.सी. चाको हे केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. 10 मार्च 2021 रोजी राजीनामा देईपर्यंत ते काँग्रेसचे सदस्य होते. चाकोला मोठा राजकीय इतिहास आहे. त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. तसंच पक्षात विविध पदे भूषवली आहेत. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला होता. सध्या ते NCP च्या केरळ राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत.

शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र प्रफुल पटेल अजित पवरांसोबत गेल्यानंतर हे पद रिक्त होतं. शरद पवार आज इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्याआधी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पाडली. या बैठकीत पी.सी. चाको आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवडक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

NCP Working President
Medha Kulkarni: 'अमोल मिटकरी असतील तर स्टेजवर बसणार नाही', मेधा कुलकर्णींनी सांगितला किस्सा; मिटकरींचाही तात्काळ पलटवार

प्रफुल पटेल अजित पवार गटासोबत गेल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली होती. त्यातच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली आहे. आता लोकसभा निवडणुकीचा निकाला काही तासांनंतर लागला आहे. ४ तारखेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्यातचं पक्षाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांची निवड करून सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

NCP Working President
CM Eknath Shinde: ...म्हणून नानांना बाेलावं लागतंय, मुख्यमंत्री शिंदेंचे पटाेलेंच्या टीकेला प्रत्युत्तर, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com