CM Eknath Shinde: ...म्हणून नानांना बाेलावं लागतंय, मुख्यमंत्री शिंदेंचे पटाेलेंच्या टीकेला प्रत्युत्तर, Video

vishal agrawal hotel in mahabaleshwar : विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील हाॅटेलच्या अनाधिकृत बांधकामाबाबत बाेलताना मुख्यमंत्र्यांनी कारवाईस सुरुवात झाली आहे असेही स्पष्ट केले.
eknath shinde answers on nana patole statement about cm not reachable
eknath shinde answers on nana patole statement about cm not reachable Saam Tv

नाना पटोले हे विरोधी पक्षात आहेत. ते विराेधी पक्ष नेते आहेत. त्यांना आमच्यावर बाेलावेच लागतय. पण त्यांना देखील माहित आहे मी थांबणारा कार्यकर्ता नाही काम करणारा आहे अशी टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटाेले यांच्या मुख्यमंत्री नाॅटरिचेबल असतात या टिकेवर केली. मुख्यमंत्री हे दरेगाव येथे साम टीव्हीशी बाेलत हाेते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मी गावी आल्यानंतर सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील लोक मला भेटायला येत असतात. त्यांच्या शंकांचे मी या ठिकाणी आल्यावर निरसन करत असतो. मी आल्यानंतर काल बुलढाण्याला चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. नॉटरिचेबल कार्यकर्ता नाही हे पटाेलेंना चांगलं माहित आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

eknath shinde answers on nana patole statement about cm not reachable
Agarwal Family's MPG Club Sealed: विशाल अग्रवालला सातारा जिल्हा प्रशासनाचा दणका, जाणून घ्या प्रकरण (Video)

महाबळेश्वरच्या पर्यावरणासोबत तडजाेड नाही : मुख्यमंत्री

महाबळेश्वरच्या पर्यावरणासोबत छेडछाड करणा-यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करा अशी सक्त सूचना मी जिल्हा प्रशासनास दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पून्हा स्पष्ट केले. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. यामुळं येथील पर्यावरणासोबत तडजोड करता येणार नाही असेही शिंदेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

eknath shinde answers on nana patole statement about cm not reachable
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com