लोकसभा २०२४

Maharashatra Loksabha: वसंत मोरे जरांगे पाटलांच्या भेटीला; सकल मराठा समाजाकडून उमेदवारी मिळणार?

Mahrashtra Politics: लोकसभेच्या निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेत. मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पुण्यातील राजकीय स्थितीविषयीची माहिती दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(लक्ष्मण सोळुंखे, जालना)

Vasant More Meets Jarange Patil :

नुकताच मनसेला जय महाराष्ट्र करून स्वबळावर अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले वसंत मोरे अंतरवालीत दाखल झालेत. वसंत मोरे यांनी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे जरांगे यांच्या भेटीला दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

मोरे यांनी जरांगे-पाटील सोबत पुण्यातील राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. यावेळी मोरे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा अहवाल देखील आणला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या चर्चानंतर आज मोरे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.(Latest News)

जरांगे त्यांच्या भेटीनंतर मोरे काय भूमिका जाहीर करणार हे पाहण आता महत्त्वाचे असणार आहे. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या लोकसभा मतदार संघ असलेल्या पुणे शहर मतदारसंघातून मोरे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मराठा समाजाचा आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून ते अंतरवाली सराटी या ठिकाणी ते दाखल झाले त्यांनी जरांगे पाटील यांना आपला आहवालही दिला. जरांगे पाटील यांनी त्यांना मी बघतो असं, म्हणत त्यांचा अहवाल स्वीकारला आहे. जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे मोरे यांच्याबाबत ही समाजाची भूमिका स्पष्ट होणार आहे.

मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटी नंतर मी आज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो आहे.या वेळी मी पुण्यात मराठा समाजाचा अपक्ष सक्षम उमेदवार आहे म्हणून बघत आहे. त्यामुळे जरांगे पाटील माझा विचार करतील अशी अपेक्षा मोरे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT