Loksabha Election 2024: ब्रेकिंग! परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार; सुनील तटकरेंकडून घोषणा

Mahadev Jankar contest Parbhani Loksabha:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या उमेदवारांची घोषणा केली आहे.
mahadev jankar
mahadev jankarSaam tv

सचिन गाड, मुंबई|ता. ३० मार्च २०२४

NCP Candidate List:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) परभणीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिरुर आणि रायगडमध्ये याआधीच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

काय म्हणाले सुनील तटकरे?

"महायुतीच जागा वाटप वेळोवेळी चर्चा सुरू आहे. भाजपने २४ उमेदवार घोषित केले. शिंदे गटाने ८ जागांवर उमेदवार घोषित केले. रायगड आणि शिरूर जागांवर अजित पवार यांनी घोषणा केली आहे. आम्ही ७-८ जागा मागितल्या आहेत. सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सुनील तटकरे यावेळी म्हणाले.

तसेच "आम्ही परभणीची जागा मागितली होती. अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ही जागा आम्हाला देण्याचं ठरलं आहे. महायुतीचे हित लक्षात घेता ही जागा महादेव जानकरांना (Mahadev Jankar) देण्याचे ठरले आहे," असे म्हणत सुनील तटकरे यांनी जानकरांच्या नावाची घोषणा केली आहे.

mahadev jankar
Nashik Lok Sabha : माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून! छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे महायुतीत महातिढा; हेमंत गोडसे काय भूमिका घेणार?

शरद पवार गटाचीही पहिली यादी जाहीर होणार!

दरम्यान, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे उमेदवारांची घोषणा करणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

mahadev jankar
Kolhapur Lok Sabha: शाहू महाराजांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे मैदानात; कोल्हापुरात घेणार जंगी सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com