Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha Election Saam Digital

Maharashtra Lok Sabha Election : 'मी लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार', प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं वक्तव्य

Lok Sabha Election 2024 : वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार करत रणशिंग फुंकलं आहे.
Published on

Maharashtra Lok Sabha Election

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिसांपासून विविध पक्षांच्या प्रमुखांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार करत रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे पुण्यातून वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही त्यांना सांगितलं होतं. मात्र महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर वंसत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. येत्या २ एप्रिलला यावर अतिंम निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आजच्या भेटीमुळे वंचितकडून वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची काल भेट झाली होती. त्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीमुळे वसंत मोरे वंचितचे पुण्यातून उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Bihar Lok Sabha Election: बिहारमध्ये महागठबंधनच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब; कुणाच्या वाट्याला किती जागा? वाचा...

वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द

गेली २९ वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेत आहेत.

२००६ साली राज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी मनसेच्या स्थापनेवेळी पक्षात प्रवेश केला.

साल २००७ मध्ये झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ८ नगरसेवक निवडून आणले. या विजयात वसंत मोरेंचा मोलाचा मोठा वाटा होता.

पुढे साल २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत वसंत मोरेंनी पुन्हा बाजी मारली होती.

साल २०१७ मध्ये वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले.

२०२१दरम्यान वसंत मोरेंना पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं.

Maharashtra Lok Sabha Election
Buldhana News: दुपारी अर्ज, संध्याकाळी उमेदवारी; बुलडाण्याची जागा शिवसेनेला कशी मिळाली, संजय गायकवाड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com