vanchit bahujan aghadi fill nomination in maval and nagar constituency
vanchit bahujan aghadi fill nomination in maval and nagar constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

Vanchit Bahujan Aghadi: नगर 'वंचित'मध्ये उभी फूट? उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दाेन्ही गट आमने-सामने; मावळात जाेशींचा अर्ज दाखल

Siddharth Latkar

दिलीप कांबळे / सुशिल थाेरात

Lok Sabha Election 2024 :

मावळ आणि नगर लोकसभा मतदारसंघात आज (गुरुवार) वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर नगर मतदारसंघात वंचितने ओबीसी बहुजन संघाशी युती करुन राजकीय वर्तुळास धक्का दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा')

मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. आज शेवटच्या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आल्याने आता मत विभागली जाणार हे निश्चित. त्याचा फटका कोणत्या दाेन पैकी काेणत्या शिवसैनिकाला बसणार हेच पाहणं महत्वाच ठरणार आहे.

ओबीसी बहुजनचे दिलीप खेडकर यांनी वंचितची उमेदवारी

नगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने आज उमेदवारी अर्ज दाखल केले. वंचितकडून दिलीप खेडकर तर एमआयएमकडून डॉ. परवेज अश्रफी यांनी आज त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

नगर दक्षिणमध्ये ओबीसी बहुजन आणि वंचितची युती झाल्याचे दिसून आले. ओबीसी बहुजनचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित आणि ओबीसी बहुजन संघाने राजकीय वर्तुळास मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरु हाेती.

वंचितमध्ये उभी फूट

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामधील वंचित आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे पाहावयास मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना डावलून ओबीसी महासंघाच्या उमेदवाराला ऐनवेळी वंचितची उमेदवारी दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर घोषणाबाजी करत बहुजन आघाडीने त्यांच्याच पदाधिकाऱ्यांचा निषेध नाेंदविला. ओबीसी बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने युती करून दिलीप खेडकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराजी पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही गट आमने-सामने आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

SCROLL FOR NEXT