Nitesh Rane : मेहुण्याला वाचविण्यासाठी भाजपात येतो असं सांगायला दिल्लीला कोण गेले होते? उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंचा गंभीर आराेप

Nitesh Rane vs Sanjay Raut : नितेश राणे म्हणाले, खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे. मुद्धाम फडणवीस यांचे नाव आणायचं काम सुरु आहे.
mla nitesh rane criticises mp sanjay raut and former cm uddhav thackeray
mla nitesh rane criticises mp sanjay raut and former cm uddhav thackeraySaam Digital

- विनायक वंजारे

Sindhudurg :

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील सत्य बाजू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी नुकतीच मांडली. त्यानंतर खासदार संजय राऊत (sanjay raut) काही महत्वाचे निर्णय सरकारचे असतात असे सांगू लागले आहेत. भाजप नेत्यांवर खाेटे गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करावी यासाठी उद्धव ठाकरेे (uddhav thackeray) व त्यांच्या मुलाने स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला अशी टीका भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

आज खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आराेप केले. मुख्यमंत्र्यांवर दबाव हाेता म्हणून त्यांनी पक्ष फाेडला. काही महत्वपूर्ण फाईल या फडणवीस यांनी राेखल्याचे राऊत यांनी म्हटले हाेते. त्यावर नितेश राणेंनी भाष्य केले.

mla nitesh rane criticises mp sanjay raut and former cm uddhav thackeray
Sangamner Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये महिलांनी ओढला हनुमान रथ, महिलांच्या पराक्रमाची साक्ष

नितेश राणे म्हणाले खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे. मुद्धाम फडणवीस यांचे नाव आणायचं काम सुरु आहे. फडणवीस यांना अटक केली असती तर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कसे आले असते हे आम्ही पाहिले असते असेही राणेंनी म्हटलं.

रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप होत होते असा गंभीर आराेप राणेंनी रश्मी ठाकरे यांच्यावर केला. त्यांना आवरा आमच्या जवळ पुरावे आहेत. ती मूलं सुद्धा बोलायला तयार आहेत असेही राणेंनी नमूद केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे डरपाेक : नितेश राणे

आमच्या नेत्यांवर खोटे आरोप करू नका आम्ही तुमच्या वक्तव्याला किमंत देत नाही. डरपोक कोण आहे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन पाहा. स्वतःच्या मेहुण्याला वाचविण्यासाठी भाजप मध्ये येतो असे सांगायला कोण दिल्लीला गेले होते ते पाहा असे सांगत राणेंनी उद्धव ठाकरें हे भाजपमध्ये येण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत हाेते असे नमूद केले. दरम्यान संजय राऊत 100 टक्के जेलमध्ये जाणार. हे मी जबाबदारीने सांगतोय असेही राणेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

mla nitesh rane criticises mp sanjay raut and former cm uddhav thackeray
Hanuman Jayanti 2024 : अंजनीपुत्र हनुमान की जय..., शेकडाे भाविकांच्या घोषणांनी दुमदुमली अंजनेरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com