Uddhav Thackeray  Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

Uddhav Thackeray News: मविआच्या सभांसाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता अखेरच्या टप्प्यात सर्व लक्ष मुंबईवर केंद्रित केलंय. कारण मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

>> भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मविआच्या सभांसाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता अखेरच्या टप्प्यात सर्व लक्ष मुंबईवर केंद्रित केलंय. कारण मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. मुंबईतल्या सहापैकी चार जागा ठाकरे गट लढवत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी या चारही जागांवर आपल्या जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. नेमक्या कुठे कुठे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत, हे जाणून घेऊ...

ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्यासाठी भांडुपमध्ये सभा घेणार आहेत. त्यानंतर उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यासाठी त्यांची तोफ धडाडणार आहे. दुपारी दक्षिण मुंबईमध्ये त्यांची अरविंद सावंतांसाठी सभा होणार असून त्यानंतर त्यांचा मोर्चा अनिल देसाईंसाठी दक्षिण मध्य मुंबईकडे वळणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात मुंबई जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं तगडी फिल्डिंग लावलीय. शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत महायुतीचा प्रचाराचा धुरळा उडवला. तर उद्धव ठाकरेंनीही इंडियाच्या बड्या नेत्यांना बीकेसी मैदानावर एकत्र आणत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसह मविआच्या मित्र पक्षांसाठीही मोठ्या संख्येनं सभा घेतल्या. मुंबईत ठाकरे गट चार तर काँग्रेस दोन जागा लढवत आहे. मात्र अखेरच्या दिवशी सुपरफास्ट उद्धव ठाकरेंनी एकाच दिवसात चार सभांची मशाल केवळ ठाकरे गटासाठीच पेटवली. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंविनाच जोर लावावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT