Purandar Airport: विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटला; शेतकऱ्यांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सुटलाय. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटलाय. महाराष्ट्र सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदत उपाययोजनांची घोषणा केली आहे.
Purandar Airport Land Acquisition:
Purandar Airport land acquisition issue resolved after a crucial meeting between Maharashtra CM and local farmers.saam tv
Published On
Summary
  • पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा दीर्घकालीन तिढा सुटला

  • मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि प्रशासनाची निर्णायक बैठक

  • शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारची सकारात्मक भूमिका

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटलाय. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातही गावातील शेतकरी, आणि जिल्हाधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटलाय. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी विमानतळात जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.

जमिनीचा एकरी राज्य शासनाने निश्चित केलेला दर वाढून मिळावा,विमानतळाच्या कंपनीमध्ये भागीदारी मिळावी,परताव्या पोटी दहा टक्के ऐवजी 35% जमीन मिळावी अशा विविध मागण्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या होत्या.त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकतात दर्शवली आहे. याबाबतचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सातही गावातील शेतकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Purandar Airport Land Acquisition:
Navi Mumbai Airport: दोन दिवसात नवी मुंबई एअरपोर्ट होणार सुरु; काय सुविधा मिळणार? जाणून घ्या A टू Z माहिती

एकरी निश्चित करण्यात आलेला दर सुधारित करण्यात येईल,समृद्धी महामार्ग आणि नवी मुंबई विमानतळसाठी संपादन करताना मोबदल्यासाठी जे मॉडेल वापरले होते. त्या मॉडेलचा अभ्यास करून मोबदल्याचा दर निश्चित करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. विमानतळामध्ये शेतकऱ्यांना भागीदारी देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तसेच मोबदल्यापोटी शेतकऱ्यांना १० टक्के परतावा जमीन देण्यात येणार होती. त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येईल, या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

Purandar Airport Land Acquisition:
Pune Traffic: पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार, सरकारचा जबरदस्त प्लान

त्याचबरोबर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण तीन हजार एकर जागेव्यतिरिक्त अन्य जागेवर जागेवरील सातबारा उताऱ्यावर जे भूसंपादनाची शिक्के मारले होते.ते सगळे शिक्के तातडीने रद्द करण्याच्या सूचनाही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. याशिवाय प्रस्तावित विमानतळामध्ये यासाठी गावातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी तातडीने स्किल सेंटर सुरू करण्यासही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

त्यामुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनातले सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. जानेवारी म्हणजे नवीन वर्षात विमानतळाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून या बैठकीनंतर सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com