South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत

Lok Sabha Election: शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असली तरी शिंदे गटाने वादग्रस्त प्रतिमा असलेल्या यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्याने अरविंद सावंत यांच्यासाठी ही लढत सोपी झाल्याचं मानलं जात आहे.
दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत
Arvind Sawant Vs Yamini JadhavSaam Tv

Arvind Sawant Vs Yamini Jadhav:

>> गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि विविध भाषिकांची संमिश्र लोकवस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ आर्थिक राजधानीचा महत्त्वाचा भाग आहे. मुंबईतली सर्वात उच्चभ्रू लोकवस्ती याच मतदारसंघात आहे. मलबार हिल, विधानभवन, आमदारांचं आणि मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, नौदलाच्या वसाहती, सीएसएमटी स्टेशन या मतदारसंघात येते. त्यासोबतच शिवडी आणि वरळीतल्या काही मध्यमवर्गीय वसाहती देखील इथे आहेत.

या मतदारसंघात मुरली देवरा चार वेळा आणि त्यांचे पुत्र मिलींद देवरांनी दोन वेळा निवडणूक जिंकत एकूण सहा वेळा काँग्रेसचा झेंडा फडकावलाय. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत अरविंद सावंतांना खासदारकीची लॉटरी लागली. कारण या मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला. आता मिलिंद देवरांनीही इतक्या वर्षांची काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सावंत विजयाची हॅटट्रीक करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत
BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असली तरी शिंदे गटाने वादग्रस्त प्रतिमा असलेल्या यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्याने अरविंद सावंत यांच्यासाठी ही लढत सोपी झाल्याचं मानलं जात आहे. अर्ज दाखल करेपर्यंत महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता. भाजपनेही जागा मिळावी यासाठी जोर लावला होता. शेवटी शिंदे गटाने ही जागा पदरात पाडून घेतली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी वादग्रस्त ठरलेले यशवंत जाधव यांची पत्नी आणि भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवलं.

2019 मधील मतांची आकडेवारी

अरविंद सावंत - शिवसेना - 4 लाख 21 हजार 937 मते

मिलिंद देवरा - काँग्रेस - 3 लाख 21 हजार, 870 मते

2014 मधील मतांची आकडेवारी

अरविंद सावंत - शिवसेना - 3 लाख, 74 हजार, 609 मते

मिलिंद देवरा - काँग्रेस - 2 लाख 46 हजार 45 मते

दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत
Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

विधानसभा मतदारसंघनिहाय कोणाची किती आहे ताकद?

शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार

वरळी - आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

शिवडी - अजय चौधरी (ठाकरे गट)

भाजपचे दोन आमदार

मलबार हिल - मंगलप्रभात लोढा (भाजप)

कुलाबा - राहुल नार्वेकर (भाजप)

शिंदे गटाच्या एक आमदार

भायखळा - यामिनी जाधव (शिंदे गट)

काँग्रेसचा एक आमदार

मुंबादेवी - अमीन पटेल (काँग्रेस)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेना दक्षिण मुंबईत मोठे खिंडार पाडता आले नाही. काही नेते मंडळींनी शिंदे गटाची वाट धरली. परंतु आजही ठाकरे समर्थकांची संख्या मोठी आहे. एकेकाळी दक्षिण मुंबईमधील काही भाग अस्सल मराठमोळे होते. मात्र गेल्या काही दशकांमध्ये मराठी टक्का कमी होत गेला आणि परप्रांतीयांची संख्या वाढली. त्याचा मराठी मतपेढीवरही परिणाम झालाय. मुंबादेवी, भायखळा, डोंगरी, उमरखाडी, बेडी बाजार आदी भाग मुस्लीम बहुल आहे. या निवडणुकीत त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरविंद सावंत तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळणार की यामिनी जाधव त्यांची विजयी घौडदौड रोखणार हे पाहणं महत्वाचं राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com