BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. भाजपच्या वार रूम मध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप
Mulund BJP VS Thackeray GroupSaam Tv

Mulund BJP VS Thackeray Group:

>> मयूर राणे

मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. भाजपच्या वार रूम मध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य असा लाठीचार्ज देखील केल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास कार्य सुरू आहे.

मुलुंड ईशान्य लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप
Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड येथिल भाजप वॉर रुमध्ये पैसे मोजण्याचे काम सुरु आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, येथे पैसे वाटण्याचे काम देखील सुरू होते. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते. येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले.

यानंतर येथे दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला. वादामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटामध्ये वाद वाढल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी सौम्य असा लाठीचार्ज केला. येथे अजूनही मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप
INDIA Alliance: मोठा भाई, छोटा भाई, ४ तारखेनंतर कोणीही राहत नाही; भाजपवर संजय राऊतांची मिश्किल टीका

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवरी म्हणजेच 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शनिवारी पाचव्या टप्प्याचा प्रचार थांबणार आहे. मतदानावेळी किंवा या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी चूक बंदोबस्त ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com