INDIA Alliance: मोठा भाई, छोटा भाई, ४ तारखेनंतर कोणीही राहत नाही; भाजपवर संजय राऊतांची मिश्किल टीका

Bandra Kurla Complex India Alliance Sabha: मोटा भाई, छोटा भाई, हा भाई तो भाई, चार तारखेनंतर आता कोणी राहणार नाही, अशी मिश्किल टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
मोठा भाई, छोटा भाई, ४ तारखेनंतर कोणीही राहत नाही; भाजपवर संजय राऊतांची मिश्किल टीका
Sanjay Raut On BJPSaam Tv

Sanjay Raut On BJP:

मोटा भाई, छोटा भाई, हा भाई तो भाई, चार तारखेनंतर आता कोणी राहणार नाही, अशी मिश्किल टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. आज मुंबईतील बीकेसी येथे इंडिया आघाडीची परिवर्तन सभा पार पडत आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि इतर मोठे नेते उपस्थित आहेत. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपल्या आघाडीतल्या सर्वांचे झेंडे इथं फडकत आहेत. ४ जूननंतर मोदी भूतपूर्व पंतप्रधान होणार आहे. ते म्हणाले, ''मोदींचा काही दिवस महाराष्ट्रात मुक्काम आहे. गल्लोगल्ली फिरत आहेत. आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणलंय. चार जूनला तुमचा आवडता झोला घेऊन हिमालयात जावं लागेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com