Maharashtra Live News Update: भाजप उमेदवारांच्या पहिली यादी शुक्रवारी जाहीर होणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५, महापालिका निवडणुका अपडेट्स, शिवसेना-मनसे युती, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

BJP: भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार अंतिम करण्याचे काम भाजपकडून सुरु

उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता

ही यादी किमान ८० उमेदवारांची असण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय

Nashik: नाशिकमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का

- नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का

- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा धक्का

- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे राहुल शेलार यांनी केला भाजपामध्ये प्रवेश

- राहुल शेलार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपत प्रवेश

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

- नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

- इच्छूक उमेदवारांना आजपासून अर्ज भरता येणार

- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरात १० विभागात व्यवस्था

- सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्याची वेळ

- सर्वच विभागीय केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार तैनात

- ३१ डिसेंबरला होणार उमेदवारी अर्जांची छाननी

- आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असली तरी अद्याप युती, आघाडीमधील जागावाटपाचा तिढा कायम

पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून भाजपला 34 जागांचा प्रस्ताव

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने शिंदे भारतीय जनता पक्षाकडे 34 जागांची मागणी

यात लोहगाव ,महंमदवाडी, कोंढवा, कोथरूड, कसबा ,कात्रज यासह समाविष्ट गावांमधील जागांचा दावा

या जागांची यादी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिली

भाजपच्या उत्तराची वाट पाहण्यात येत असल्याचा दावा सेनेकडून केला जात आहे

Nagpur: नागपूरातील गोळीबार चौकात मोठी आग

- बाजीराव गल्लीतील कपड्याच्या दुकानाला लागली आग

- दाटीवाटीची वस्ती असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या जाण्यास अडचण

- आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

Nashik: नाशिकच्या जेजुरकर मळ्यात बिबट्याचा वावर

- जेजुरकर मळ्यातील लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद

- परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

- रात्रीच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका चार आठ दिवसांत जाहिर होणार, वळसे पाटलांचा दावा

नगरपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार, याबाबतचा संभ्रम कायम असतानाच माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसेपाटील यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या चार ते आठ दिवसांत लागतील असा दावा केलाय याआधीही त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखा अचूक सांगितल्या होत्या. दिलीप वळसेपाटील मंचर येथील शेवाळवाडी येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख राष्ट्रवादीत

काँग्रेस पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष मुक्तार शेख यांनी काँग्रेसचा राजीनामा देत हाती घड्याळ बांधला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अश्यातच पुण्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले मुख्तार शेख यांनी त्यांच्या पुत्रासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दोन वेळा काँग्रेसकडून नगरसेवक राहिलेले मुख्तार शेख यांनी त्यांचे पुत्र विकार अहमद शेख यांनी आज अजित पवारांची भेट घेतली .गेली ४० वर्ष मी काँग्रेस पक्षाचा काम केलं. १९९२ पासून आत्ता पर्यंत मी महापालिकेची निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून सभागृहात नागरिकांचे प्रतिनिधित्व केलं. प्रत्येक पालिका निवडणुकीत तसेच लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाने जी काही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे मी निभावली. काँग्रेस पक्षाने आत्ता पर्यंत अल्पसंख्याक समाजाला कोणतंही नेतृत्व करण्याची संधी दिली नाही आणि हीच बाब लक्षात घेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. येत्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण समाजाला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Pune: पुणे महापालिकेसाठी उमेदवार आजपासून सादर करणार अर्ज

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे जागा वाटप, उमेदवार निश्चित करणे यावर खलबते सुरु असताना आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत असणार आहे

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध

तब्बल पावणे चार वर्षानंतर होणार पुणे महापालिकेची निवडणूक

१५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ ते ४१ प्रभागांचे वाटप केले आहे

काही क्षेत्रीय कार्यालयात दोन प्रभागांचे तर काही क्षेत्रीय कार्यालयात तीन प्रभागांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील

Nagpur: नागपुरात २५ लाख रुपयांच्या जीएसटी फसवणुकीचा पर्दाफाश

- बनावट कागदपत्रांवर जीएसटी क्रमांक मिळवून खोटा इनपुट टॅक्स क्रेडिट दाखवला.

- लड्डू खान पठाण, चंद्रपाल राय नान्हे आणि अन्य एक आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल.

- बनावट वीज बिल, बँक खाते, पत्ता आणि व्यवसाय कागदपत्रांचा वापर.

- १९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घोटाळा.

- जीएसटी अधिकारी प्रमोद पिंगे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात केस.

- शासनाच्या महसुलाला २५ लाखांचा तोटा.

- पोलिस तपास सुरू, आणखी धागेदोरे तपासले जात आहेत.

Winter Weather: पुण्यासह राज्यभरात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता

गारठलेल्या महाराष्ट्राला दिलासा, थंडी झाली अंशतः कमी

पुण्यासह राज्यभरात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता

उत्तरेतील ही थंडी सध्या महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे

राज्यातील विविध जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ

आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, आयुष कोमकरच्या आईची विनंती

५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. याप्रकरणात आंदेकर कुटुंबियातील अनेक जणं शिक्षा भोगत आहेत. अशातच त्यांच्यातील सदस्य हे पुणे महापालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत असतानाच आता आयुष कोमकर च्या आई ने समोर येत राजकीय पक्षांना विनंती केली आहे. आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा मी आत्मदहन करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. बंडू आंदेकर ची सून म्हणजेच वनराज आंदेकर ची बायको सोनाली आंदेकर आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड, ठाकरेंच्या नेत्याचा संशय, पोलिसात केली तक्रार

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातून मोठी बातमी. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार शिवानी थाटे यांनी व्यक्त केला ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा संशय. तेल्हारा पोलिसात केली तक्रार दाखल. एका मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअपवर आलेल्या मॅसेजमध्ये 941 मतांनी आपला पराभव होणार असल्याचा आधीच सांगण्यात आलंये. काल नगरपालिका पालिका निवडणुकीचा निकाल होता. निकालाच्या दिवशी पोस्टल मतदान सुरू असतानाच आला होता मेसेज. ज्या मोबाईल क्रमांकवरून पराभूत थाटे यांना मेसेज आला होता, त्या क्रमांकाच्या व्हाट्सअप DPवर अमित शहा यांचा फोटो.

पोलीस आयुक्तांचे पीआरओ निलंबित; बडतर्फीची प्रक्रिया सुरू

पुणे जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पीआरओ सहायक पोलीस फौजदार प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून, सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Maharashtra Live News Update: बदलापूरनंतर वांगणी जवळच्या कराव गावात बिबट्याची दहशत

बदलापूर जवळच्या आंबेशीव गावात बिबट्याची दहशत पसरलेली असतानाच आता वांगणी जवळच्या काराव गावातही बिबट्या दिसल्याने खळबळ उडालीय. रात्रीच्या सुमारास काराव-बदलापूर रस्त्यालगत बिबट्या दिसून आल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. काल (सोमवारी) कारावमधील ग्रामस्थ विलास देशमुख कारने आपल्या घरी येत असताना त्यांना या बिबट्याचं दर्शन झालं. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना तत्काळ याची माहिती दिली आणि सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com