मुंबईत मोठा राडा; CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रस्ता अडवला

mumbai news : मुंबईत मोठा राडा झाला आहे. CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे.
Mumbai News
mumbai newsSaam tv
Published On
Summary

बांगलादेशात हिंदू युवकाच्या हत्येचे भारतभर पडसाद

मुंबईतही बांगलादेशातील अत्याचाराचे पडसाद उमटले

मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशनबाहेर हिदुत्ववादी संघटनेचं आंदोलन

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. भारतातील विविध ठिकाणी या अत्याचाराचा निषेध नोंदवला जात आहे. मुंबईतही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईत आंदोलन केलं. बांगलादेश दूतावासाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलकांनी जमत रस्ता अडवला. त्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai News
महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांची मोठी खेळी; सुप्रिया सुळे, रोहित पवारांना दिली महत्वाची जबाबदारी

बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हिंदू युवकाच्या हत्येवरून देशातील विविध भागात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून मोर्चे काढले जात आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून बांगलादेश सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती दौर्मुदू मूर्मू यांना कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्या प्रकरणाचे पडसाद मुंबई शहरातही उमटले आहेत. मुंबईतही हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेश दूतावासाबाहेर आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai News
हिंदूंनी किमान ३-४ मुलं जन्माला घातली पाहिजेत; नवनीत राणा यांचं वक्तव्य

आंदोलकनकर्त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते. काही आंदोलकर्त्यांनी रस्त्यावर बसून बांगलादेश सरकारचा विरोध केला. आंदोनकर्त्यांमुळे रस्त्यावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पुढील काही क्षणात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. तसेच रस्त्यावरील आंदोलनकर्त्यांना पोलिसांना बाजूला हटवलं. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com