Shreya Maskar
शेजवान चकली बनवण्यासाठी पाणी, बटर, शेजवान चटणी, लाल मिरची पावडर, मीठ, रवा, तांदळाचे पीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.
शेजवान चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात बटर, शेजवान चटणी, लाल मिरची पावडर, बारीक रवा आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
गॅसवर पॅन ठेवून तयार मिश्रण मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित भाजून घ्या. पीठ पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या.
एका बाऊलमध्ये भाजलेले मिश्रण, पाणी आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. यात थोड तेल टाकून चांगले कणिक मळून घ्या.
त्यानंतर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा आणि चकली पात्रात भरून घ्या. तुमच्या आवडता चकलीचा साचा यात टाका.
एका कागदावर तांदळाचे पीठ पसरवून चकली त्यावर पाडा. जेणेकरून ती चिकटणार नाही आणि सहज उचलता येईल.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हळूहळू सर्व चकल्या खरपूस भाजून घ्या. लक्षात घ्या गॅस मंद आचेवर ठेवा. नाहीतर चकली जळेल.
थंडीत गरमागरम चहासोबत चटपटीत शेजवान चकलीचा आस्वाद घ्या. ही चकली हवाबंद डब्यात तुम्ही चांगली स्टोर करू शकता.