Shreya Maskar
हिवाळ्यात चहासोबत काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर झटपट वांग्याचं भजी बनवा. अगदी सिंपल रेसिपी आताच नोट करा.
वांग्याचं भजी बनवण्यासाठी वांगी, बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट , मीठ, हळद, आलं - हिरवी मिरची पेस्ट, जिरे पावडर इत्यादी साहित्य लागते.
वांग्याची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम वांग्याचे गोल काप करून घ्या. तुम्हाला आवडत नसेल तर वांग्याची साल काढून टाका.
कापलेल्या वांग्याच्या मधोमध चीर पाडा आणि पाण्यामध्ये भिजत ठेवा. जेणेकरून वांग्याचे काप काळे पडणार आहे. भजीसाठी कोवळी वांगी निवडा.
एका ताटात लाल तिखट, मीठ आणि हळद घालून मिक्स करा. तयार मसाल्याते वांग्याचे काप छान घोळवून घ्या. जेणेकरून मसाला सर्व बाजूला लागेल.
त्यानंतर बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, आलं - हिरवी मिरची पेस्ट, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.
दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बेसनाच्या पीठात घोळवलेले वांग्याचे काप टाका. लक्षात घ्या भजी तळताना गॅस कमी ठेवा.
वांग्याचे भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत वांग्याचे भजी खा. गरमागरम चहासोबत हा पदार्थ खूप टेस्टी लागेल.