Shreya Maskar
दह्याची कढी बनवण्यासाठी दही, बेसनाचे पीठ, हळद, पाणी, तेल, जिरे, मोहरी, मीठ, साखर, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरच्या, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
दह्याची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दही काढून घ्या. दही जास्त थंड असू नये. कढी करण्यासाठी रूम टेम्परेचरवर असलेल्या दह्याचा वापर करा.
यात तुपात परतलेले बेसन आणि हळद घालून रवीच्या साहाय्याने व्यवस्थित घुसळून घ्या. यामुळे कढीमध्ये गुठळ्या होणार नाही.
कढीला एक उकळी आल्यावर त्यात आलं-लसणाची पेस्ट, साखर, मीठ, हळद घालून मिक्स करा. तुम्ही आवडीनुसार साखर यात घाला.
शेवटी दह्याची कढी ५ मिनिटे चांगली उकळू द्या. त्यानंतर यात फोडणी टाका आणि आंबट-गोड कढीचा आस्वाद घ्या.
आता कढीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात. मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून मिक्स करा.
कढी शिजवत असताना चमच्याने सतत ढवळत राहा. जेणेकरून कढी चांगली बनेल. तसेच कढी सतत ढवळत राहिलो नाही तर ती फुटण्याची शक्यता असते.
शेवटी दह्याच्या कढीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमागरम भातासोबत दह्याच्या कढीचा आस्वाद घ्या.