sveep awareness program held in wardha on eve of lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

Sveep Awareness Program In Wardha : वर्धेतील 1 लाख 4 हजार 634 विद्यार्थ्यांकडून मतदार जागृती, नातेवाईकांना लिहिले पत्र

Wardha News : मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावत असतांना सुजाण नागरिक म्हणून निवडणुकीत मतदान करा अशी जागृती करण्यात आली.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Lok Sabha Constituency :

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्हा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या 1 लाख 4 हजार 634 विद्यार्थ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहिले. या पत्रावर पालकांची स्वाक्षरी घेवून त्याबाबतची नोंद शाळा दप्तरी ठेवण्यात आली आहे. (Maharashtra News)

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 1 हजार 469 शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सेलू तालुक्यातील 154 शाळा, आर्वी तालुक्यातील 209 शाळा, हिंगणघाट तालुक्यातील 222 शाळा, कारंजा (घा.) तालुक्यातील 124 शाळा, समुद्रपूर तालुक्यातील 197 शाळा, आष्टी तालुक्यातील 91 शाळा, वर्धा तालुक्यातील 295 शाळा व देवळी तालुक्यातील 177 शाळांचा यामध्ये समावेश होता.

भारतीय राज्यघटनेने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावत असतांना सुजाण नागरिक म्हणून निवडणुकीत मतदान करा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच भविष्याच्या पिढीसाठी आपले मत मौल्यवान आहे. निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही दबावाला, अमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा, अशा आशयाचे पत्र वर्धा जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांना लिहिले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी उत्तम खरात यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT