Ravindra Chavan and Shrikant Shinde Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan News: दिव्यातील वादावर पडदा? कल्याणमधून श्रीकांत शिंदेच असतील उमेदवार; भाजपच्या बैठकीत काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

Kalyan Lok Sabha Constituency: ''कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात करा'', असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Lok Sabha Election 2024:

''कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात करा'', असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं. डोंबिवली ब्राह्मण सभा सभागृह येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, आज दिवा येथील भाजपाचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या, अशी मागणी करत पत्र भाजप प्रदेशाध्यक्षना पाठवलं होतं. त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर या वादावर आता पडदा पडल्याचं बोललं जातंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळाल्या माहितीनुसार, कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा येथील भाजपचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराने भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी पत्राद्वारे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. (Latest Marathi News)

या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार श्रीकांत शिंदेंच असणार आहेत. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू करा, असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.

याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आचारसंहिता लागल्यापासून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातडॉ श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी ही बैठक घेतल्याचे सांगितले. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

SCROLL FOR NEXT