महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच महायुतीत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा आहे. राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये याबाबत चर्चा देखील झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास बैठक झाली.
राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे आणि विनोद तावडे हेही बैठकीमध्ये उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मनसेला महायुतीत घेतलं तर त्यांचं स्थान काय असेल यावर बैठकीत चर्चा झाली. फक्त लोकसभाच नाही तर आगामी काळातील निवडणुकीत मनसेला काय स्थान असेल यावर देखील चर्चा झाली.
अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर राज ठाकरे मुबंईला रवाला झाले आहे. मनसे महायुतीची सहभागी होण्याची घोषणा मात्र मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)
राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करून आज १७ वर्षे उलटून गेली. मनसेने या दरम्यान लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या. २००९ वगळता राज ठाकरे यांच्या पक्षाला फार यश मिळालं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना आपली राजकीय ताकद टिकवण्यासाठी आणि सत्तेसोबत जोडण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आगामी निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी झाली तर, भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल, असे मानले जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महायुतीत भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांचा समावेश असला तरी, राज ठाकरे यांच्यासारखा फायरब्रँड नेता सोबत आला तर महायुतीची ताकद निश्चितच वाढेल. याशिवाय राज ठाकरे सोबत आल्याने मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल.
सध्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे समोर येत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कमकुवत होईल असं वाटत होतं. मात्र पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या भावनिक लाटेचा फायदा उद्धव ठाकरेंना होताना दिसत आहे. त्यांच्या सभांना, कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीवरून त्यांचा जनाधार स्पष्ट होतो. याउलट शिंदे गटावर विविध आरोप केले जात आहेत. यातून उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती मिळत आहे. त्यामुळे ठाकरे नावाचा करिश्मा कमी करण्यासाठी महायुतीला त्या तोडीच्या राजकीय नेत्यांची गरज आहे. ही भूमिका राज ठाकरे उत्तमरित्या पार पाडू शकतात आणि उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूतीची लाट काही प्रमाणात कमी होऊ शकते.
राज ठाकरे यांचं भाषण अनेकांना बाळासाहेबांची आठवण करून देते. याशिवाय राज ठाकरेंच्या वक्तृत्वशैलीचे अनेक जण फॅन आहेत. त्यामुळे राज ठाकरेंमध्ये गर्दी खेचून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारात राज ठाकरेंची भाषणे गेमचेंजर ठरू शकतात. महायुतीतील प्रचाराचे अनेक मुद्दे राज ठाकरेंमार्फत लोकांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात.
शिवसेनेकडून दिवंगत बाळासाहेब यांच्या नावाचा वापर केला जात आहे. कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सातत्याने बोललं जात आहे. मात्र त्यावरुन उद्धव ठाकरे शिंदे गटावर सडकून टीका करत आहेत. दुसऱ्यांच्या वडिलांचं नाव का वापरता? असा थेट सवाल उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र राज ठाकरे सोबत आल्यास बाळासाहेबांवर हक्क सांगणारा हक्काचा माणूस महायुतीला मिळू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे जेवढ्या आक्रमकपणे शिंदे गटावर तुटून पडतात, तेवढं राज ठाकरेंविरोधात त्यांना बोलता येणार नाही.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांशिवाय मनसे फॅक्टर मुंबई महापालिका निवडणुकीतही निर्णायक ठरू शकतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागील दोन दशकांहून अधिक काळ राहिलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी मनसेचा महायुतीला फायदा होऊ शकतो. मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी राज ठाकरे यांचा महायुतीतील सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.