Vijay Shivtare  Saam Tv
लोकसभा २०२४

Vijay Shivtare: पाठीमागे हटायच नाही हा माझा स्वभाव पण..., विजय शिवतारेंनी भर सभेत सांगितलं निर्णय बदलण्यामागचं कारण

Priya More

Vijay Shivtare On Ajit Pawar:

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद मिटल्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. सासवड (Saswad) येथील महायुतीचा शेतकरी जनसंवाद मेळाव्याला या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मंचावर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये विजय शिवतारे यांनी त्यांचा निर्णय बदलण्यामागचे कारण सांगितले आहे. 'पाठीमागे हटायचं नाही हा माझा स्वभाव. पण याला मी छेद दिला.' असल्याचे विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

विजय शिवतारे यांनी सांगितले की, 'मला बोललं जात होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. सर्व मीडिया जिथे मी असेल तिथं होता. माझं लॉजिक ठीक होतं पण आता जाऊद्या. लोकांना प्रचंड उत्साह होता. अनेक जण माझ्यापाठीशी उभे राहिले. २ वेळा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली. पण माझं मन तयार नव्हतं. दादा मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होते. कुठल्या ही प्रकारे लढायचं असा निश्चय मी केला होता. आयुष्याची लढाई आरपार लढायची तयारी केली होती.

विजय शिवतारे यांनी यावेळी निर्णय बदलण्यामागचे कारण सांगितले,'आज विश्वास वाटणार नाही देवाने या शिवतरेला खूप आशीर्वाद दिला. पाठीमागे हटायच नाही हा माझा स्वभाव पण याला मी छेद दिला. मला एक फोन आला की तुम्ही उभे राहिलात तर महायुतीला अडचण होईल. इथे सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. पण खरे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मी निर्णय बदलला. मुख्यमंत्रीसाहेब मला कुठली ही भीती नाही. अजित पवार यांना सेट बॅक नको म्हणून मी हा निर्णय घेतला. माझ्यावर अनेक टीका केल्या गेल्या.'

विजय शिवतारे पुढे म्हणाले की, 'विजय शिवतारेला खोक्याची गरज नाही. दादांना पण राग होता. बोलता बोलता अनेक जण रागात बोलत असतात. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही दादा, ताई यांच्यासोबत आहोत. मी भाईंच ऐकलं, उपमुख्यमंत्री याचं ऐकलं. पुरंदरमधील रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्यासाठी शब्द द्यावा असं मी मुख्यमंत्री यांना बोललो. मला माहिती नाही मी किती वर्ष जगेल पण मला एक माहिती आहे की, दादा, मुख्यमंत्री शब्द देतील.'

अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये असलेल्या दुश्मनीबद्दल देखील विजय शिवतारे यांनी यासभेदरम्यान सांगितले. ते म्हणाले की, 'आमची दुशमनी लोकांनी बघितली आता मैत्री पण बघा. देवाची उरुळी, फुरसुंगी वेगळी नगर परिषद केली तर दादा तुमच्या मतांमध्ये पाऊस पडेल. गोष्टी घडतात विसरून जायचंय असतात. मतभेद असतात पण मनभेद नको. घड्याळाला मतदान झालं पाहिजे. सुनेत्रा पवार यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान. बारामतीच्या विजयाच्या वाट्यामध्ये पुरंदर असेल.' असे म्हणत विजय शिवतारे यांनी जनतेला सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT