Sharad Pawar : विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतंय, महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिकांवर शरद पवारांची टीका

Sharad Pawar On Sanjay Mandlik: 'आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.', असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे.
Sanjay Mandlik Controversy Statement
Sharad Pawar On Sanjay Mandlik:Saam Tv

Sanjay Mandlik Controversy Statement:

कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. 'आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.', असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. 'या प्रकारची टीका करतायेत याचा अर्थ विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतेय.', अशा शब्दात शरद पवार यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिक यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'ते काय बोलले मला माहीती नाही. पण मंडलिक यांचा हा काही प्रश्न आहे का? ⁠म्हणजे हे लोक कोणत्या पातळीपंर्यत जातायेत ते दिसतेय. सेवेचा आदर्श ठेऊन शाहु महाराज काम करतायेत. ⁠या प्रकारची टीका करतायेत याचा अर्थ विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतेय.'

Sanjay Mandlik Controversy Statement
Sanjay Mandlik: महाराजांबद्दल संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य, राजकीय वर्तुळ ढवळलं; विरोधकांसह महायुतीचे नेतेही संतापले

तसंच, 'शाहू महाराजांविषयी जनमाणसात आदर आहे. राजघराण्यावर दत्तक गोष्ट नव्या नाहीत. दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो. शाहू छत्रपतींच्या कार्याविषयी जनतेमध्ये कृतज्ञता आहे.', असे म्हणत शरद पवार यांनी संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

यासोबतच, धैर्यशिल मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर स्वत:च माहिती दिली. ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात दिवसेंदिवस परीस्थिती बदलतेय. ⁠अनेक लोकं राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. ⁠धैर्यशिल मोहीते पाटील आमच्या गटात येत आहेत. ⁠दोन दिवसांत त्यांचा पक्ष प्रवेश आहे. नुकताच त्यांनी माझी भेट घेतली. ⁠जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल. ⁠भाजपचे दोन वेळा पुणे जिल्हा अध्यक्ष राहिलेले नामदेव ताकवने देखील पक्षात येत आहेत.' असे पवारांनी यावेळी सांगितले.

Sanjay Mandlik Controversy Statement
K. Kavitha: BRSच्या नेत्या के.कविता यांच्या अडचणीत वाढ, ईडीनंतर आता सीबीआयने केली अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com