Sanjay Mandlik: माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागेल, संजय मंडलिक आपल्या विधानावर ठाम

Sanjay Mandlik On Shahu Chhatrapati: संजय महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली. तसंच काहींनी माफी मागावी अशी मागणी केली. संजय मंडलिक यांनी या सर्व टिकांनंतर आता यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Mandlik On Shahu Chhatrapati
Sanjay MandlikSaam Tv
Published On

Sanjay Mandlik Controversial Statement:

छत्रपती शाहू महाराजांबाबत (Chhatrapati Shahu Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हे सध्या चर्चेत आले आहेत. 'आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.', असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली. तसंच काहींनी माफी मागावी अशी मागणी केली. संजय मंडलिक यांनी या सर्व टिकांनंतर आता यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 'एका शब्दाने सुद्धा मी शाहू महाराज यांचा अपमान केला नाही.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कोल्हपूरमध्ये भाषण करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

संजय मंडलिक यांनी कोल्हापुरात भाषण करताना सांगितले की, 'खरं म्हटलं तर एका शब्दाने सुद्धा मी शाहू महाराजांचा अपमान केला नाही. आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे. मी फक्त ऐवढंच म्हणालो की, ते थेट वारसदार नाहीत. थेट वारसदार असतील तर ते तुम्ही आम्ही आहोत, शाहूविचारांची मंडळी आहोत. हा विचार माझा आहे. हे होत असताना तो विषय ठेवायचा बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागावी. पण कशाबद्दल माफी मागायची. थेट वारसदार आहेत की नाही ते त्यांनी सिद्ध करावं. थेट वारसदार नसतील आणि माझं म्हणणं काही चूकले असेल तर मी माफी मागेल.'

Sanjay Mandlik On Shahu Chhatrapati
Prithviraj Chavan: संजय मंडलिक यांचे हे उद्गार भाजपच्या ग्रँड स्टॅटेजीचा भाग तर नाही ना?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांची कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. 'आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.', असं विधान त्यांनी केलं होतं.

Sanjay Mandlik On Shahu Chhatrapati
Sharad Pawar : विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतंय, महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिकांवर शरद पवारांची टीका

या सभेदरम्यान, संजय मंडलिक यांनी असे देखील म्हटले होते की, 'माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. ही शाहू महाराजांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार दिला. इथे राहणारा प्रत्येक माणूस शाहू विचार घेऊन जगतो.' संजय मंडलिक यांच्या शाहू महाराजांसंदर्भातील वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार टीका होत आहे.

Sanjay Mandlik On Shahu Chhatrapati
Satej Patil On Sanjay Mandlik: कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत, महाराजांची माफी मागा; सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com