Satej Patil On Sanjay Mandlik: कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत, महाराजांची माफी मागा; सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

Chhatrapati Shahu Maharaj: यावेळी 'कोल्हापूरातील जनता याचे उत्तर त्यांना मताद्वारे देतील. कोल्हपूरची लोकं त्यांना कोल्हापूरीबाणा दाखवतील.', असा टोला त्यांनी संजय मंडलिक यांना लगावला आहे.
Satej Patil On Sanjay Mandlik
Satej Patil On Sanjay MandlikSaam Tv

Sanjay Mandlik Controversial Statement:

छत्रपती शाहू महाराजांवरांबाबत (Chhatrapati Shahu Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यावर आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी टीका केली आहे. 'कोल्हापूरकर हे सहन करणार नाही. संजय मंडलिकांनी महाराजांची आणि कोल्हापूरकरांची माफी मागावी.', असे वक्तव्य करत त्यांनी संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याचसोबत त्यांनी यावेळी 'कोल्हापूरातील जनता याचे उत्तर त्यांना मताद्वारे देतील. कोल्हपूरची लोकं त्यांना कोल्हापूरीबाणा दाखवतील.', असा टोला त्यांनी संजय मंडलिक यांना लगावला आहे.

सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचे काम त्यांनी केले आहे याचा मी निषेध करतो. कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाही अशाप्रकारचे हे अपमानास्पद वक्तव्य आहे. या निवडणुकीची सुरूवात झाली तेव्हा चंद्रकांतदादा, मुश्रीफसाहेब या सगळ्यांनी वर्तमान पत्रातून सांगितले होते की वैयक्तिक टीका शाहू महाराजांच्या बद्दल कोणीही करणार नाही. या प्रकारच्या सूचना देऊनसुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये लाखांच्या पुढे लीड वाढत चालले आहेत त्यामुळे अशाप्रकराचे वक्तव्य करत आहेत.'

Satej Patil On Sanjay Mandlik
Sharad Pawar : विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतंय, महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिकांवर शरद पवारांची टीका

सतेज पाटील पुढे म्हणाले की,'कोल्हापूरकर हे सहन करणार नाही. त्यांनी त्वरित माफी मागावी. त्यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे. त्याचे प्रायश्चित्त त्यांना भोगावे लागेल. या कोल्हापूरातील जनता, शाहूमहाराजप्रेमी हे सहन करणार नाही. कोल्हापूरातील जनता याचे उत्तर त्यांना मताद्वारे देतील. कोल्हपूरची लोकं त्यांना कोल्हापूरीबाणा दाखवतील. निवडणूक हातातून जात चालली आहे हे त्यांना स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे वेगळ्या दिशेला निवडणूक घेऊन जाण्याचे काम ते करत आहेत. हे कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही. निवडणूक बाजूला राहिली पण कोल्हापूरकर हे सहन करणार नाही.

Satej Patil On Sanjay Mandlik
Sanjay Mandlik: महाराजांबद्दल संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य, राजकीय वर्तुळ ढवळलं; विरोधकांसह महायुतीचे नेतेही संतापले

कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही असे म्हणत सतेज पाटील यांनी सांगितले की, 'कुस्ती तुम्ही करा कुस्ती करण्याबद्दल अडचण नाही. पण खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करु नये. महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार नाही असे तुम्ही आधी बोलला आहात. मग आता तुम्ही ही पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता सहन करणार नाही ते त्यांना योग्य उत्तर देईल. शाहूप्रेमी याचा निश्चित निषेध व्यक्त करतील. दोन्ही नेत्यांनी वर्तमानपत्रात सांगितले होते. तर त्यांनी आता त्यांना जाब विचारला पाहिजे.

तसंच, आम्ही स्पष्टपणे मंडलिकांना कोलापूरी भाषेत उत्तर देण्याची वेळ आली तर देऊच. याचे पडसाद जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभर उमटेल. आता प्रविण दरेकरांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न करू नये. संजय मंडलिक यांनी महाराजांची माफी मागावी, कोल्हापूरकरांची माफी मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी. छत्रपती घराण्याचा अपमान त्यांनी केला आहे याचा निषेध आम्ही करतो. त्यांच्या पाठीमागे कोण आहे जो असल्या गोष्टी करायला सांगत आहे हे त्यांनी शोधावे.', असे म्हणत सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Satej Patil On Sanjay Mandlik
K. Kavitha: BRSच्या नेत्या के.कविता यांच्या अडचणीत वाढ, ईडीनंतर आता सीबीआयने केली अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com