Praniti Shinde vs Ram Satpute News:  Saamtv
लोकसभा २०२४

Solapur Loksabha: प्रणिती शिंदे की राम सातपुते; विजयी गुलाल कोण उधळणार? मनसे- शरद पवार गटात लागली १ लाखाची पैज!

Praniti Shinde vs Ram Satpute Solapur Loksabha News: अशीच एक पैज सोलापूर लोकसभेसाठीही लागलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पवार पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये तब्बल एका लाखाची पैज लागली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. १६ मे २०२४

लोकसभा निवडणुकांचे मतदान आता अंतिम टप्प्यात आले आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. मात्र त्याआधीच निकालाचे अंदार्ज वर्तवले जात आहेत, अनेक उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्सही झळकू लागलेत. आपलाच उमेदवार निवडून येणार म्हणत अनेक कार्यकर्त्यांनी लाखोंच्या पैजेचा विडाही उचलला आहे. अशीच एक पैज सोलापूर लोकसभेसाठीही लागलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पवार पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये तब्बल एका लाखाची पैज लागली आहे.

प्रणिती शिंदे की राम सातपुते?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यामुळे प्रणिती शिंदेंसाठी ही लढत आव्हानात्मक मानली जात आहे. अशातच सोलापुरच्या निकालावरुन मनसे आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तब्बल १ लाखांची पैज लागली आहे.

तब्बल १ लाख १ हजाराची पैज

सोलापुरमध्ये भाजपचे राम सातपुते जिंकणार असा दावा करत मनसेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी १ लाख १ हजार रुपयांची पैज लावली आहे. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी १ लाख १ हजाराच्या पैजेचा विडा उचलला आहे. त्यामुळे ही एका लाखाची पैज कोण मारणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

सोलापुरमध्ये कोणाचे पारडे जड?

दरम्यान, सलग दोनवेळा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी सोलापुर हा काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना आडाम मास्तर यांची साथ लाभल्याने आणि राम सातपुतेंची साथ सोडून विजयसिंह मोहिते पाटील यांनीही काँग्रेसला ताकद दिल्याने प्रणिती शिंदे यांची वाढती ताकद दिसत आहे. मात्र मतदार राजा कुणाच्या बाजूने आहे, याचे चित्र ४ जूनलाच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : बांधकाम पाडले तर बाळाला फेकून आत्महत्या करेल; अतिक्रमण विरोधी पथकाला धमकावत शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

Shreya Bugde: श्रेया बुगडेचं स्टायलिश फोटोशूट, फॅन्सकडून सौंदर्याचं होतय कौतुक

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज! बैल शेतात गेला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण, जाब विचारणाऱ्या भावांनाही चोपलं; Video

Homa Vastu Tips: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

Ovarian cancer: अंडाशयाचा कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT