नाशिक, ता. १६ मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास गेलेला आहे, त्यामुळेच ते प्रचार सभेतील भाषणातून धर्म, जातींवर बोलतात, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले शरद पवार?
"आपण देश चालवायचा असेल तर जाती धर्माचा विचार करुन चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास गेला आहे. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे लोकांना भटकवण्यासाठी ते जाती- धर्मांवर बोलत आहेत," अशी टीका शरद पवार यांनी यावेळी केली.
"ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे. एकदा मी इस्त्रायलला चाललो होतो. तेव्हा मोदींनी मला फोन केला. त्यांचा व्हिसा अमेरिकेने नाकारला होता. त्यावेळी त्यांनी मला घेऊन चला अशी विनंती केली. तेव्हा मीच त्यांना इस्त्रायल दौऱ्यावर घेऊन गेलो," असा किस्साही शरद पवार यांनी सांगितला.
मुंबईतील रोडशो वरुन मोदींना फटकारले!
"मुंबईसारख्या शहरात रोड शो आयोजित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. हे बरोबर नाही," असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुन शरद पवार यांनी टीका केली. तसेच त्यांनी फक्त गुजराती भागातचं दौरा केला असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे काय चाललयं समज नाही," असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.