पुणे, ता. १६ मे २०२४
महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काल नारायणगाव येथील एका बड्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावमध्ये ही धडक कारवाई केली असून चौकशीसाठी ९० जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी नारायणगाव आणि जुन्नर येथील दोन प्रतिष्ठित व्यावसायिकांनी आयटी कंपनी सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. मात्र, या ठिकाणी महादेव बुक आणि लोटस ३६५ या ॲपद्वारे ‘आयपीएल’ आणि इतर खेळांवर ऑनलाइन सट्टा खेळण्यात येत असल्याची पोलिसांना मिळाली होती.
या माहितेच्या आधारे गुन्हे शाखा आणि खेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात यापूर्वी ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य, नोएडासह अन्य काही शहरांत महादेव बेटिंग ॲपच्या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.