PM Modi Road Show: PM मोदींचा मुंबईत भव्य रोड शो, पाहावं तिथे गर्दीच गर्दी! VIDEO

PM Narendra Modi Road Show In Mumbai: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोची सुरुवात झाली आहे. मोदी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याचं दिसतं आहे.
PM Narendra Modi Road Show In Mumbai
PM Narendra Modi Road Show In MumbaiSaam Tv

PM Narendra Modi Rally In Mumbai:

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोची सुरुवात झाली आहे. मोदी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याचं दिसतं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे आज मुंबईत आहेत. याच दरम्यान, त्यांचा हा रोड शो होत आहे. या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत.

घाटकोपर ते मुलुंड दरम्यान होणाऱ्या या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सगळे रस्ते गर्दीने खचाखच भरल्याचं दिसत आहे. मोदींच्या या रोड शोमध्ये गाड्यांचा मोठा ताफाही त्यांच्यासोबत असल्याचं दिसत आहे.

PM Narendra Modi Road Show In Mumbai
Chhagan Bhujbal : कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, भुजबळांचं PM मोदींना पत्र

तसेच या रोड शोमध्ये भाजपसोबतच महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. मोदींच्या गाडीच्या पुढे मोठ्या संख्येने भाजपच्या महिला कार्यकर्ता चालताना दिसत आहेत.

मोदींच्या रोड शोमुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन, पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी घातली आहे. दरमयान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होण्याआधी त्यांनी नाशिक आणि कल्याण येथे भव्य सभेला संबोधित केलं.

PM Narendra Modi Road Show In Mumbai
PM Modi Kalyan Sabha: काँग्रेसकडून सुरू असलेला हिंदू-मुस्लिमचा खेळ केला उघड, PM मोदींचा मोठा दावा

मेट्रो सेवा पूर्ववत

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या रोड शो आणि सुरक्षेच्या कारणाने बंद असलेली मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे. घाटकोपर मेट्रो स्टेशन ते जागृती नगर मेट्रो स्टेशन यादरम्यान संध्याकाळी सहानंतर मेट्रो सेवा बंद होती. यादरम्यान मोठ्या प्रमाणात घाटकोपर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र आत्ताच मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com