Viral Accident Video: सुसाट वेगाने घात केला! इंस्टा लाईव्ह सुरू असतानाच भयंकर अपघात; २ ठार| थरारक VIDEO

160 kmph Car Accident While Instagram Live: येणा- जाणाऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करत गाडी चालवणारा मुलगा मस्ती करत असतो. अशातच त्याचे नियंत्रण सुटते अन् गाडीचा भयंकर अपघात होतो.
160 kmph Car Accident While Instagram Live:
160 kmph Car Accident While Instagram Live:Saamtv

गुजरात, ता. १६ मे २०२४

सध्याची तरुणाई प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी धडपडत असते. सोशल मीडियावर अल्पावधीत फेमस होण्यासाठी, चर्चेत येण्यासाठी आणि लाईक, व्हिव्यूज मिळवण्यासाठी तरुण - तरुणी काहीही करायला तयार असतात.

मात्र अनेकदा त्यांचे हे थरारक स्टंट जीवघेणेही ठरु शकतात. असाच एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम लाईव्ह करत सुसाट कार चालवताना झालेल्या या अपघातात २ तरुणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदाबादवरुन पाच तरुण ब्रिझा कारने मुंबईच्या दिशेने निघाले होते. प्रवास सुरू असतानाच या तरुणांनी इंस्टाग्राम लाईव्ह करण्याचे ठरवले. गाणी, मस्ती, धिंगाणा अशी मजामस्ती करत या तरुणांचा प्रवास सुरू होता. आपले सोशल मीडियावरील फॉलोअर्स, चाहते, मित्रपरिवाराला दाखवण्यासाठी या तरुणांनी गाडीचे स्पीड वाढवले.

बघा मित्रांनो कार किती वेगात पळते असे म्हणत लाईव्ह करणाऱ्या तरुणाने गाडीचे स्पीड १६० किमी असल्याचे दाखवले. मात्र गाडीचा हाच वाढता वेग भीषण अपघाताचे कारण ठरला. येणा- जाणाऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करत गाडी चालवणारा मुलगा मस्ती करत असतो. अशातच त्याचे नियंत्रण सुटते अन् गाडीचा भयंकर अपघात होतो.

160 kmph Car Accident While Instagram Live:
Akola News: काँग्रेसचा बडा नेता गोत्यात, अकोल्यात गुन्हा दाखल; प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

या दुर्दैवी घटनेत अमन मेहबुबभाई शेख आणि चिरागकुमार के. पटेसल या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीमधील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी असे जीवघेणे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे.

160 kmph Car Accident While Instagram Live:
Loksabha Election 2024: नादखुळा! तिरडीवर बसून अर्ज भरायला पोहोचला उमेदवार, स्मभानभूमीत थाटले 'प्रचार' कार्यालय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com