Loksabha Election 2024: नादखुळा! तिरडीवर बसून अर्ज भरायला पोहोचला उमेदवार, स्मभानभूमीत थाटले 'प्रचार' कार्यालय

Loksabha Election 2024 Unique Candidate: उत्तरप्रदेशमधील एक उमेदवार चक्क तिरडीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याचा प्रकार समोर आला आहे. राजन यादव असे या उमेदवाराचे नावे नाव असून त्याच्या या नादखुळा एन्ट्रीची सर्वत्र चर्चा होत आहे.
Loksabha Election 2024 Unique Candidate:
Loksabha Election 2024 Unique Candidate: Saamtv

देशभरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. अनेक दिग्गजांसह सामान्य उमेदवारही लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी अनेकजण नवनवे फंडे वापरताना दिसतात. सध्या उत्तरप्रदेशमधील एक उमेदवार चक्क तिरडीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याचा प्रकार समोर आला आहे. राजन यादव असे या उमेदवाराचे नावे नाव असून त्याच्या या नादखुळा एन्ट्रीची सर्वत्र चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि बनसगाव लोकसभा जागांसाठी सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. 7 मे पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच मंगळवारी राजन यादव हे चक्क तिरडीवर बसून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले.

राजन यादव हे गोरखपूर मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. मंगळवारी ते चक्क तिरडीवर बसून अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांची ही हटके एन्ट्री पाहून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बघ्यांनीही मोठी गर्दी केली. राजन यादव हे उच्चशिक्षित असून त्यांनी त्यांनी एमबीएची पदवी घेतली आहे. मात्र नोकरी न करता समाजकार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Loksabha Election 2024 Unique Candidate:
Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगांची झाडाझडती

विशेष म्हणजे राजन यादव यांनी आपले लोकसभा निवडणुकीचे प्रचार कार्यालयही चक्क राप्ती नदीच्या काठावर बांधलेल्या स्मशानभूमीत उघडले आहे. परंतु निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत राजन यादव यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा लढवण्यात येणार नाही.

"निवडणूका जिंकून संसदेत जाणारे बहुतांश नेते भ्रष्ट झाले आहेत. भ्रष्ट राजकारणामुळे संसदेची अंत्ययात्रा निघत आहे, मी या अंत्ययात्रेवर स्वार होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे. लोकांनी भ्रष्ट नेता निवडू नये, असा संदेश देत आहे, "अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Loksabha Election 2024 Unique Candidate:
Latur News: शुभमंगल सावधान! पोलीस ठाण्याच्या दारातच वाजली सनई, लातूर पोलिसांनी लावलं प्रेमीयुगुलाचं लग्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com