Sanjay Raut On Mandlik Saam Digital
लोकसभा २०२४

Sanjay Raut On Mandlik : छत्रपतींच्या गादीचा अवमान खपवून घेणार नाही; मंडलिकांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत कडाडले

Chhatrapati Shahu Maharaj News : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं म्हटलं आहे.

Sandeep Gawade

Sanjay Raut On Sanjay Mandlik

कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही छत्रपतींच्या गादीचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, अशा इशारा दिलाआहे.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत. गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आहेत. छत्रपती शाहुंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदीच्या गादीचा मान राखायचा? अशा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडलं आहे, आता ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते बोलत आहेत ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि जे ज्यांनी वक्तव्य केले ते शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांना कोल्हापूरची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांची गादी आहे त्या गादीविषयी सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे शाहू महाराजांना शह देण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत केलेल्या एका विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं विधान त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT