Amit Shah Nanded's Speech : ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच होईल; अमित शहा यांचा नांदेडच्या सभेत पुनरुच्चार

Amit Shah in Chikhali Nanded : नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ३ ऱ्या क्रमांकावर आणली. त्यामुळे ही निवडणूक नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठीच होणार आहे. नांदेडचा मोसम बिघडला असेल पण देशात ४०० पारचा मोसम आहे, असा दावा अमित शहा यांनी केला.
Amit Shah Nanded's Speech
Amit Shah Nanded's Speech Saam Digital
Published On

Amit Shah Nanded's Speech

नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ३ ऱ्या क्रमांकावर आणली. त्यांच्या नेतृत्त्वात अनेक चांगले निर्णय घेणात आले. त्यामुळे ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच होणार आहे, असा दावा अमित शहा यांनी नांदेडच्या सभेत केला.

नांदेडचा मोसम बिघडला असेल, काँग्रेसचा बिघडला असेल, मात्र देशात ४०० पारचा मोसम आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी झाली आहे आणि या दोघांनी काँग्रेसलाही अर्ध करून टाकलं, असा टोला अमित शहा यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

देशात आणि राज्यातही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल रामटेकमध्ये सभा झाली त्यानंतर आज लगेचच अमित शाह यांची नांदेडमध्ये प्रचारसभा झाली. सुरुवातीला त्यांनी देशात सामाजिक क्रांती आणण्यात महात्मा फुले यांचं मोठं योगदान आहे, असं म्हणत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात महाराष्ट्र आणि राजस्थानचा काश्मीर प्रश्नाशी काही संबंध नाही. मात्र काँग्रेसने अनौरस बाळासारखं कलम ३७० सांभाळलं. मात्र नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवलं आणि देशाशी जोडण्याचं काम केलं, आता महाराष्ट्राचा आणि राजस्थानचा काश्मीर प्रश्नाशी संबंध आहे की नाही, असा सवाल अमित शहा यांनी जनतेला केला.काँग्रेसला वाटतं की वातावरण बिघडलं आहे. मात्र देशातलं वातावरण उत्तम आहे. लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील. ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची निवडणूक आहे हे विसरू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Amit Shah Nanded's Speech
Sanjay Raut On Mandlik : छत्रपतींच्या गादीचा अवमान खपवून घेणार नाही; मंडलिकांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत कडाडले

निवडणुकीनंतर आघाडीत बिघाडी नक्की

महाराष्ट्रात तीन पक्ष भाजपच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी राष्ट्रवादी आणि एक थोडीशी राहीलेली. काँग्रेस. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला, या दोघांनी काँग्रेसलाही संपवून टाकलं. हे संपलेले पक्ष महाराष्ट्राचं भलं करू शकतात का? अशी बोचरी टीका त्यांनी केली. ही अशी एक ऑटोरिक्षा आहे जिला तीन चाकं तर आहेतच पण गिअर बॉक्स वेगळ्याच कंपनीचा आहे. या रिक्षाला दिशाच नाही. निवडणूक झाली की मतभेदांनीच ही आघाडी फुटून जाईल, अशी आघाडी राहुल गांधीच्या नेतृत्वात लढत आहे, असं ते म्हणाले.

Amit Shah Nanded's Speech
Prithviraj Chavan: संजय मंडलिक यांचे हे उद्गार भाजपच्या ग्रँड स्टॅटेजीचा भाग तर नाही ना?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com