Sanjay Raut Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Raut: एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर भाजपमध्ये आनंदी आनंद; पण संजय राऊतांनी एका वाक्यात हवाच काढली

Sanjay Raut On Exit Polls Prediction: संजय राऊतांनी एक्झिट पोलच्या आकडेवारीवर टीका केली आहे. त्यांनी इंडिया आघाडीच सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Rohini Gudaghe

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देशात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजावर खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कालचे एक्झिट पोल हे ठरवून केले आहेत. राजस्थानमध्ये २६ जागा आहेत. एक्झिट पोल कंपनीने तिकडे भारतीय जनता पक्षाला ३३ जागा दाखवल्या आहेत. सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला ८०० ते ९०० जागा देतील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ध्यान-तपस्या करून जिंकता येणार नसल्याची बोचरी टीकाही संजय राऊतांनी केली (Lok Sabha 2024 Result) आहे.

धमक्या देऊन जिंकता येणार नाहीत. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे. २९५ ते ३१० जागांचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. कालचा एक्झिट पोल 'पैसा फेको तमाशा देखो' असा पोल (Sanjay Raut On Exit Polls) आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ३५ पेक्षा अधिक जागा मिळवेल, ३० तर नक्कीच मिळवणार असा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया ताई किमान दीड लाख मताने येतील, असा अंदाज देखील संजय राऊतांनी वर्तविला आहे. ओपनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षात चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष या देशात गृह मंत्रालय आणि ते यंत्रणा कशाप्रकारे याच्यावर दबाव टाकते, ते सर्वांना माहिती असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

ज्याची खावी पोळी, त्याची वाजवाळी टाळी असं एक्झिट पोलचं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. जे लोकांच्या मनात आहे, तोच निकाल महाविकास आघाडीबद्दल लागेल असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे जनतेचा कौल पाहण्यासाठी ध्यानधारणा (BJP PM Modi) करण्याची गरज नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Fraud : बँकेत महाघोटाळा, तब्बल 195 बोगस कर्ज खाती; माजी अध्यक्षांसह 50 जणांवर गुन्हा, VIDEO

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Shocking News : जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

SCROLL FOR NEXT