Sanjay Raut: 4 जूननंतर मजा येणार..! संजय राऊतांचं सूचक विधान, मोदींच्या ध्यानधारणेवरही खोचक टीका

Sanjay Raut on Narendra Modi Meditation: संजय राऊतांची नरेंद्र मोदी यांच्या ध्यानधारणेवर सडकून टीका, एकनाथ शिंदे यांच्यासह निवडणूक आयोगावरही निशाणा

मुंबई : संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. इतकंच काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. चार जूननंतर मजा येणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी निवडणुकीच्या निकालात विजयाचा विश्वास व्यक्त केला. आम्ही घाबरणारे नाही आहोत, असं त्यांनी ठामपणे म्हटलंय. निवडणूक आयोगाला हाताशी धरुन मोदींनी आपलं मतदान शेवटच्या टप्प्यात ठेवलं, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीला गेलेल्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरुही राऊतांनी टोला लगावलाय. 27 कॅमेरे लावून कुणीही ध्यानधारणा करायला बसत नाही, असं म्हणत राऊतांनी खोचक शब्दांत मोदींना सुनावलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com