Maharashtra Politics Vanchit Bahujan Aaghadi Letter To Mahavikas aaghadi on Lokabha Election Seat Sharing  Saam Tv
लोकसभा २०२४

Mahavikas Aghadi : वंचितला कोणताही नवीन प्रस्ताव जाणार नाही; मविआच्या बैठकीत एकमत

प्रविण वाकचौरे

आवेश तांदळे | मुंबई

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणूक २०२४ चं वेळापत्रक काल निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आता वेगाने कामाला लागले आहे. महाविकास आघाडी देखील आपल्या जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल रात्री पार पडली. (latest politics news)

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची ही बैठक झाली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागावाटपाच्या अंतिम फॉर्मुलावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत सर्वांचच एकमताने ठरलं की, आता वंचित बहुजन आघाडीला कोणताही नवीन प्रस्ताव पाठवला जाणार नाही.

या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड काँग्रेसकडून अशोक गहलोत, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते. सूत्रांच्या माहितनुसार जागावाटप तिढा सोमवार किंवा मंगळवारी सुटण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वंचितला ४ जागांचा प्रस्ताव

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आधीच चार जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. संजय राऊत यांनी याबाबत म्हटलंय की, आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचितने महाविकास आघाडीसोबत यावे. आमच्याबरोबर त्यांनी निवडणूक लढाव्यात. यासाठी आमच्याकडून आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांना ज्या जागा दिल्या आहेत, त्या त्यांच्या यादीमध्ये होत्या, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

मात्र महाविकास आघाडीने दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा अशी मागणी आता वंचितने केली आहे. मात्र आता वंचितला नवीन प्रस्ताव पाठवला जाणार नाही असं महाविकास आघाडीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे.

कसा असेल महाविकास आघाडीचा फॉर्म्युला?

महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसला प्रत्येकी १८-१८ जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीसमोर ४ जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर रासप आणि स्वाभिमानीसाठी प्रत्येकी १-१ जागा सोडण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT