Mahayuti News : महायुतीच्या जागावाटपाच्या तिढा कायम; भाजपच्या २० जागा, शिवसेना-राष्ट्रवादीचं काय?

Loksabha Election 2024 : भाजपला २० हून अधिक जागा मिळणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही.
Mahayuti (BJP, Shivsena Eknath Shinde Group,NCP Ajit Pawar Group) Seat Sharing
Mahayuti (BJP, Shivsena Eknath Shinde Group,NCP Ajit Pawar Group) Seat SharingSaam Tv
Published On

आवेश तांदळे | मुंबई

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. मात्र महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने राज्यात २० जागांची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला २० हून अधिक जागा मिळणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठका सुरु आहे. मात्र अद्याप जागावाटपाबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. (latest politics news)

Mahayuti (BJP, Shivsena Eknath Shinde Group,NCP Ajit Pawar Group) Seat Sharing
Kalyan Politics: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; कल्याणमधील पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश

राज्यातील तिन्ही बड्या नेत्यांची अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. अमित शाहा मुंबई आले होते त्यावेळी देखील जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे लवकरत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी आशा वर्तवली आहे.

Mahayuti (BJP, Shivsena Eknath Shinde Group,NCP Ajit Pawar Group) Seat Sharing
Kalyan News : महेश गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; हिललाईन पोलिसांत गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?

कुणीला किती जागा मिळणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपला ३१ जागा मिळतील असं देखील बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com