निवडणूक जाहीर होऊन देखील नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीत खलबतं सुरूच आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सोडलेल्या नाशिकच्या जागेवरून शरद पवार, संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गोकुळ पिंगळे यांना उद्धव ठाकरे गटातून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडून लढण्याऐवजी शरद पवार गटाकडून लढवण्याची गोकुळ पिंगळे यांची तयारी आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
या मतदारसंघात ठाकरे गटाला उमेदवार मिळला नाही तर नाशिकची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे घेण्याचा पर्याय महाविकास आघाडीकडे असेल. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत शरद पवार,संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये खडबते सुरू आहेत. महायुतीसमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली सुरू आहेत.
तर दिंडोरीच्या जागेवर माकने दावा केला असून जागा लढवण्यावर माकप ठाम आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरीची जागा माकपसाठी सोडावी, असा आग्रह माकपने केला आहे. शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याचा माकपचा दावा आहे. शरद पवार गटाने जागा न सोडल्यास माकप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. माजी आमदार जे पी गावित दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.