Beed : मनाेज जरांगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यात सहावा गुन्हा दाखल, 16 मराठा आंदाेलकांचाही समावेश

Manoj Jarange Patil Latest Marathi News : नेकनुर पोलिस ठाण्याचे कर्मचारी विशाल क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
police charged manoj jarange patil in beed
police charged manoj jarange patil in beedSaam TV
Published On

Manoj Jarange Patil News :

मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिस ठाणे येथे आज (शनिवार) पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याची तक्रार पाेलिसांत नाेंदविण्यात आली हाेती. त्यावरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून बीड (beed) जिल्ह्यात आतापर्यंत मनाेज जरांगे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यामध्ये एकूण सहा गुन्हे दाखल झालेत. (Maharashtra News)

नेकनुर पोलिस ठाण्याचे कर्मचारी विशाल क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड येथील तांदळवाडी घाट येथे सप्ताह निमित्त मनोज जरांगे पाटील यांचे रात्री उशिरापर्यंत भाषण झाले. त्यांनी भाषणात प्रक्षोभक वक्तव्य देखील केले.

police charged manoj jarange patil in beed
Maharashtra Election 2024 : शरद पवारांना जुना राग काढायचा असेल, शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे षडयंत्र : संजय मंडलिक

यावरून (भादंवि कलम 505 (1)(ब) ,कलम 188, भादवि सहकलम 135) मनोज जरांगे पाटील यांच्यासह 16 जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर यापूर्वी बीड येथील शिरूर कासार पोलिस ठाणे, अमळनेर पोलिस ठाणे, पेठ बीड पोलिस ठाणे, पिंपळनेर पोलिस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलिस ठाणे आणि आता नेकनूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

police charged manoj jarange patil in beed
Maharashtra Election 2024: मी संन्यास घेणार नाही; साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? उदयनराजे भोसले यांनी थेट सांगूनच टाकलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com