mohite patil faction will support ranjitsinh naik nimbalkar in madha lok sabha constituency says shahaji bapu patil saam tv
लोकसभा २०२४

माढा लाेकसभा मतदारसंघात पाच आमदारांची वज्रमूठ, मोहिते पाटलांबाबत शहाजीबापू पाटलांना ठाम विश्वास

ranjitsinh naik nimbalkar : माढा लोकसभा उमेदवारीमधून सुरु झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बनू लागला असून रविवारी मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यानंतर आज (साेमवार) खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आपली ताकद दाखवणार आहेत.

भारत नागणे

Madha Lok Sabha Constituency :

माढा लाेकसभा मतदारसंघात नाराज असलेला भाजपचा मोहिते पाटील गट (mohite patil faction) हा कुठलेही चुकीचे पाऊल उचलणार नाही, ते नक्की पक्षाची शिस्त पाळतील असा आत्मविश्वास आमदार शहाजीबापू पाटील (shivsena mla shahajibapu patil) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा उमेदवारीमधून सुरु झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बनू लागला असून रविवारी मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यानंतर आज (साेमवार) खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (bjp mp ranjitsinh naik nimbalkar) हे आपली ताकद दाखवणार आहेत. खासदार निंबाळकर यांनी टेंभुर्णी येथील आमदार संजयामामा शिंदे (mla sanjaymama shinde) यांच्या फार्म हाऊस येथे सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला माढा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे (mla baban shinde), करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे (mla sanjay shinde), माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते (mla ram satpute), माणचे आमदार जयकुमार गोरे (mla jaykumar gore), सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आदीसह भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत. ही बैठक अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊस वरती सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यापूर्वी आमदार शहाजी बापू पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना खासदार निंबाळकर यांना यंदा दोन लाखांचे मताधिक्य देऊ. त्यांना निवडून आणू अशी भावना व्यक्त केली. ते म्हणाले नाराज असलेले मोहिते पाटील हे कुठलेही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत. ते नक्की पक्षाची शिस्त पाळतील असा विश्वास ही आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Election 2024)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT