सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांनी निवडणुक लढविण्याची व्यक्त केलेली इच्छा आणि या मतदारसंघाची जागा महायुतीमधील राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे (Nationalist Congress Party) असल्याचा दावा यामुळे उमेदवारीबाबत वाढलेल्या तिढ्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष साता-याकडे लागले आहे. त्यातच आज (साेमवार) अचनाक भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांनी जलमंदिर पॅलेस (jal mandir palace satara) येथे उदयनराजे भाेसले यांची भेट घेतल्याने सातारकरांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
सातारा येथील लाेकसभेची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडे असल्याचा दावा महायुतीमधील राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) हे सातत्याने करु लागल्याने भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उदयनराजेंना उमेदवारी द्यावी यासाठी सातारा येथील मराठ समाज, आरपीआय यांची देखील मागणी आहे. शनिवारी उदयनराजेंनी उमेदवारीबाबत बाेलताना त्यावेळी ठरवू, मी संन्यास घेणार नाही असे वक्तव्य करीत मतदारसंघात जनतेच्या भेटीगाठींवर भर दिला.
दरम्यान रविवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (vijaysinh mohite patil) यांच्या अकलूज येथील शिवरत्न या निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत मोहिते पाटील कुटुंबीयांमधील नेत्यांशी चर्चा केली. माढा मतदारसंघात भाजपने रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने या चर्चेदरम्यान त्यांनी मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
आज मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांच्या भेटीला आले आहेत. उदयनराजे यांनी महाजन यांचे जलमंदिर पॅलेस येथे स्वागत केले. त्यांनंतर या दाेन्ही नेत्यांमध्ये जलमंदिर पॅलेस येथील दरबार हाॅलमध्ये काही काळ चर्चा झाली.
या चर्चेचा तपशिल अद्याप समजलेला नसला तरी महाजन यांनी उदयनराजेंना आश्वासित केल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.