maratha samaj to contest from madha lok sabha constituency
maratha samaj to contest from madha lok sabha constituency  Saam tv
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha Election 2024 : 'माढा'त मराठा समाजातील 50 जणांनी ठाेकला शड्डू; उमेदवार निवडीचे सर्वाधिकार मनाेज जरांगे पाटलांना

भारत नागणे

Madha Lok Sabha Constituency :

माढा लोकसभा मतदार संघातून मराठा उमेदवार देणार असून विजयाचा गुलाल आमचाच असणार असा निर्धार सकल मराठा समाजाने आज (गुरुवार) व्यक्त केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यासाठी आज माळशिरस सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाने एक उमेदवार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मराठा आंदोलक मनोज जरांगे (manoj jarange patil) यांच्या आदेशानुसार माळशिरस येथे मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयाेजिली हाेती. या बैठकीला तब्बल 3 हजार मराठा बांधव उपस्थित होते.

या बैठकीत सुमारे 50 जणांनी माढा मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवली. दरम्यान यातून एकच सक्षम उमेदवाराची निवड मनाेज जरांगे पाटील हे करणार आहेत अशी माहिती धनंजय साखळकर (राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा) यांनी दिली. या उमेदवाराचा प्रचार आणि निवडून आणण्याची जबाबदारी सकल मराठा समाज घेणार असल्याचे बैठकीत सर्वांनी निश्चित केले.

मराठा समाजासह इतर समाजाची मते मिळतील कारण गाव गाड्यात सर्व जाती गुण्या गोविंदाने राहतात. त्यामुळे ते ही मराठा समाजाला मदत करतील. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, एसआयटी चौकशी असे समाजाचे मुद्दे घेऊन प्रचार करणार असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care Tips: त्वचेला सीरम लावण्यापूर्वी ही काळजी घेताय ना?

Akola News : संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर; कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद

Mumbai Local News : लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

Today's Marathi News Live : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Wooden Comb: केस विंचरण्यासाठी लाकडी की प्लास्टिकचा कंगवा वापरावा?

SCROLL FOR NEXT