दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal) यांच्या अटकेच्या निषेर्धात दिल्लीसह महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीची (enforcement directorate) विराेधात आंदाेलन केले. यावेळी अनेक ठिकाणी रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. राज्यातील परभणी जिल्ह्यात 'आप'च्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीराचे आयाेजन करुन अनाेख्या पद्धतीने केजरीवाल यांचा अटकेचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)
परभणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते म्हणाले मुख्यमंत्र्याला पदावर कार्यरत असताना अटक झाल्याची ही देशातील पहिलीच घटना असावी. केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने कायदाचा धाक दाखवत आहे. राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा स्वच्छ आहे.
त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ परभणीत आयाेजिलेल्या रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाले. सुमारे 125 जणांना यामध्ये सहभागाची नाेंदणी केली. त्यापैकी सुमारे 100 नागरिकांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. या आंदोलनाची परभणी जिल्ह्यात देखील चर्चा झाली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.