Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसने डाव टाकला ; धुळ्यातून नाशिकच्या उमेदवाराला उतरवलं निवडणुकीच्या रिंगणात

Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मोठा डाव टाकला आहे. शोभा बच्छाव यांच्या रुपाने अनेक वर्षानंतर नाशिकचा उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे.

Sandeep Gawade

Dhule Lok Sabha

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मोठा डाव टाकला आहे. शोभा बच्छाव यांच्या रुपाने अनेक वर्षानंतर नाशिकचा उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाणचा परिसर येत असल्याने काँग्रेसने ही रणनीती आखली आहे. धुळ्यातील काँग्रेस नेत्यांने निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र काँग्रेसची ही नवी रणनिती यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

भाजपतर्फे सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या वतीने शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या तीन निवडणुकांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्या बाहेरील उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शोभा बच्छाव यांचा नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये तगडा जनसंपर्क असल्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातून आता दोन डॉक्टरांची लढाई खासदारकीसाठी रंगणार आहे. माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणारे आहे. डॉक्टर शोभा बच्छाव या गेल्या तीन दशकापासून काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या महापौर त्यानंतर त्यांनी दोन वेळेला आमदारकी भूषवली आहे. यामध्ये आरोग्य राज्य मंत्रिपद सुद्धा मिळालेलं असल्याने त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक शहरातील निवासी उमेदवाराची घोषणा ही डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT