PM Narendra Modi : जम्मू काश्मीरमध्ये आर्टीकल 370 अनेक दशकं कायम का राहिलं? PM नरेंद्र मोदींनी सांगितलं खरं कारण

PM Narendra Modi Public Meeting Ramtek Nagpur : जम्मू काश्मीरमध्ये 370 कायम ठेवण्याच काम काँग्रेसने केलं, मात्र भाजप सरकारने जम्मू ३७० आर्टीकल हटवून या जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. त्यानंतर लोकांना संविधानिक अधिकार मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या सभेत केला.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Digital

PM Narendra Modi

जम्मू काश्मीरमध्ये अनेक दशकं ३७० आर्टीकल लागू करण्यात होतं. त्यामुळे SC, ST जनता त्यांच्या अधिकारांपासून अनेक वर्षे वंचित राहिली. जम्मू काश्मीरमध्ये 370 कायम ठेवण्याच काम काँग्रेसने केलं, मात्र भाजप सरकारने जम्मू ३७० आर्टीकल हटवून या जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. त्यानंतर लोकांना संविधानिक अधिकार मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या सभेत केला.

इंडिया आघाडी संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार करत आहे. मी राजकारणात आल्यापासून हेच ऐकत आहे. यांच्याजवळ नवीन कल्पना नाही', मात्र 'काँग्रेसने एक देश एक संविधान लागू होऊ दिलं नाही. आज संविधानाच्या नावाने अपप्रचार करणाऱ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुमच्यासाठी संविधान इतकेच महत्त्वाचे आहे, तर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला संपूर्ण देशात लागू करण्याची हिम्मत का नाही दाखवली, असा सवालपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशात सत्तर, पंच्याहत्तर वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान संपूर्ण देशात लागू केलं नव्हतं. याला जबाबदार कोण आहे? मी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशात बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केलं, असा दावा मोदींनी यावेळी केला.  'घराणेशाही पक्षांनी संविधानिक भावनेचा विरोध केला. स्वतःचा कुटुंबाला समोर नेण्याचे काम केले. एस-एसटी वंचित राहिले. त्यांना हक्क देण्याचे काम गरीब कुटुंबातील मोदींने करून सामाजिक न्याय केला. गरिबांना पक्के घर, रेशन, उपचार, वीज, पाणी, गॅस, मोदींच्या गॅरंटीचा लाभ आदिवासी आणि एसटी लोकांनाही मिळाला.''(Latest Marathi News)

PM Narendra Modi
CM Eknath Shinde: विरोधक मोदीद्वेषाने पीडित, त्यांच्या अहंकाराची लंका जनता जाळेल; एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य

आता एक गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला तर इंडिया आघाडीला देशाचं संविधान धोक्यात असल्याचं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, पाण्यावर कितीही लाठी मारली तरी पाणी दुंभगत नाही. तसेच गरिबाच्या या मुलावर कितीही हल्लाबोल केला तरी नरेंद्र मोदी या देशातील जनतेच्या सेवेतून मागे हटणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं.

PM Narendra Modi
Ashok Chavan: नाना पटोलेंमुळे काँग्रेसने जागा गमावल्या, मविआच्या जागावाटपावरून अशोक चव्हाण यांची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com