Maharashtra Politics 2024 : राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर डोंबिवलीत मनसेला धक्का; 7 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गमचे वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

Raj Thackeray

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गमचे वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह सात जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा दिल्याचे मिहिर दवते यांनी सांगितलं आहे. मनसेच्या सोशल मिडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे.

मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकरीता बिनशर्त महायुतीला पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर एकीकडे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साह आहे. तर दुसरीकडे नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीतील मनसे विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दवते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दवते यांनी मनसेच्या सोशल मीडियावर राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांची बदलती भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत असल्याने मी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिल्याचे दवते यांनी संगितलं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है " - आमदार राजू पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदींसाठी आम्ही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची भूमिका मांडली .याबाबत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू ऊर्फ प्रमोद पाटील यांनीही सोशल मीडियाद्वारे " उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है " अशा आशयाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra Politics 2024
Nana Patole Car Accident: नाना पटोले यांच्या कार अपघातप्रकरणी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र, चौकशीची केली मागणी

या सोशल मीडिया पोस्टमध्ये आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय, त्यासाठी देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, विकसनशील ते विकसित भारतापर्यंतचा झालेला बदल इथपासून ते देशांतील विरोधकांची अवस्था अशा सर्व मुद्द्यांवर परखड मते मांडली आहेत. तसेच या मुद्द्यांच्या आधारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली पाठिंब्याची भूमिका योग्यच कशी आहे यावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले आहे.

Maharashtra Politics 2024
Rohit Pawar On Raj Thackeray: भाजपसोबत जाऊन आपली स्वायत्तता घालवली, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com