Nana Patole Car Accident: नाना पटोले यांच्या कार अपघातप्रकरणी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र, चौकशीची केली मागणी

Congress Letter To Election Commission: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे.
Nana Patole Accident
Nana Patole Saam Tv
Published On

Nana Patole Car Accident Update:

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारला मंगळवारी रात्री अपघात झाला होता. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली होती. प्रचार आटोपून सुकळी गावाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले थोडक्यामध्ये बचावले. या अपघाताप्रकरणी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. अशामध्ये या अपघाताप्रकरणी काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र पाठवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे. कारला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंसह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची केली मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

Nana Patole Accident
PM Narendra Modi : जम्मू काश्मीरमध्ये आर्टीकल 370 अनेक दशकं कायम का राहिलं? PM नरेंद्र मोदींनी सांगितलं खरं कारण

नाना पटोले यांना सुरक्षा असताना देखील त्यांच्या कारला अपघात झाल्याने याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. नाना पटोले सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. डॉ. शांत पडोळे हे या निवडणुकीत विजयी व्हावे यासाठी नाना पटोले दिवस-रात्र एक करत दौरे करत आहेत. मंगळवारी देखील नाना पटोले यांनी अनेक ठिकाणी प्रचार दौरे केले होते. या दौऱ्यावरून परत येत असताना अपघाताची घटना घडली होती.

Nana Patole Accident
CM Eknath Shinde: विरोधक मोदीद्वेषाने पीडित, त्यांच्या अहंकाराची लंका जनता जाळेल; एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य

नाना पटोले प्रचार पूर्ण झाल्यानंतर आपल्या ताफ्यासोबत त्यांच्या गावाकडे जात होते. त्याचवेळी भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या कारला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने जोरात धडक दिली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की नाना पटोले यांच्या कारचे पाठीमागच्या बाजूने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताचा तपास भंडारा पोलिसांकडून सुरू आहे.

Nana Patole Accident
Rohit Pawar On Raj Thackeray: भाजपसोबत जाऊन आपली स्वायत्तता घालवली, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com