Sujay Vikhe vs Nilesh Lanke Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election Result: मोठी बातमी! सुजय विखेंना जोर का झटका; निलेश लंकेंची जोरदार मुसंडी

Maharashtra Loksabha Election Result: राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी आघाडी घेतली आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. ४ जून २०२४

 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांतच स्पष्ट होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मोतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना जोर का झटका देत मोठी आघाडी घेतली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध महायुतीचे सुजय विखे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. सुरूवातीच्या कलानुसार निलेश लंंके यांनी सुजय विखे यांना जोरदार टक्कर देत मोठी आघाडी घेतली आहे.

अहमदनगरमध्ये मतमोजणीच्या ११ व्या फेरीत निलेश लंके ९००० मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर 15 व्या फेरीअखेर निलेश लंके 15753 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सुजय विखेंची धाकधुक चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, साताऱ्यामध्ये मोठा उलटफेर झाला असून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सुरूवातीला शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजे भोसले यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. मतदानात आघाडी घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून जोरदार जल्लोष केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT