Nashik Plane Crash: नाशिकमध्ये वायूदलाचे विमान कोसळले, दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने पडले बाहेर

Air IndiaPlane Crashes In Nashik: नाशिकमध्ये वायूदलाच्या विमानाला अपघात झाले आहे. पिंपळगावातील शिरसगाव परिसरातील शेतामध्ये वायुदलाचे विमान कोसळले.
Nashik News: नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळले, पायलट सुखरूप
Plane Crashes In NashikSaam Tv

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या पिंपळगावातील शिरसगाव परिसरात वायू दलाचे मिग विमान कोसळलं. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पायलट पॅराशूटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने तो सुखरूप आहे. विमान ज्याठिकाणी कोसळले तिथे सगळीकडे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये दुपारच्या सुमारास वायूदलाचे विमान अचानक कोसळले. पिंपळगावातील शिरसगाव परिसरातील शेतामध्ये हे विमान कोसळले. शेतामध्ये कोणीच काम करत नसल्यामुळे आणि पायलट वेळीच पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून बाहेर पडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik News: नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळले, पायलट सुखरूप
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने उधळला गुलाल; १ लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळाल्याने जल्लोष

या अपघातामध्ये विमानाचे दोन तुकडे झाले आणि विमानाला आग लागली. घटनास्थळावर सध्या धुराचे लोट पसरले आहेत. अपघाताच्या ठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. वायू दलाकडून सध्या या अपघाताचा तपास सुरू आहे. हे सुखोई ३० विमान असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik News: नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळले, पायलट सुखरूप
Pune Porsche Car Accident : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी २ जणांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

या घटनेची माहिती मिळताच वायूदलाच्या बचाव पथकाचं हेलिकॉप्टरच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आहे. विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवानं पॅराशूटच्या मदतीनं दोन्ही पायलट बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमध्ये एक पायलट जखमी झाला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Nashik News: नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळले, पायलट सुखरूप
Kolhapur News: कोल्हापूरात अपघाताचा थरार, कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर ६ गंभीर जखमी; अपघात CCTV मध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com